मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्ट रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. तेव्हापासून हे दोघेही आपल्या मुलाबद्दल सतत चर्चेत असतात.
बाळाच्या जन्मानंतर एका महिन्यानंतर या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव उघड केले आहे. यासोबतच दोघांनीही आपल्या मुलाची झलक एकत्र दाखवली आहे. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी या पोस्टमध्ये त्यांच्या बाळाच्या नावाची घोषणा केली आहे.
या जोडप्याने त्यांच्या बाळाचे नाव ‘वायू’ ठेवले आहे. सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक क्यूट फॅमिली फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिघेही पिवळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत.
यासोबतच सोनमने लिहिले- ‘वायू हा हिंदू धर्मग्रंथातील पाच घटकांपैकी एक आहे. हनुमान हे भीम आणि माधव यांचे अध्यात्मिक पिता आणि वायूचे अतुलनीय सामर्थ्यवान स्वामी आहेत.’ या अर्थानेच सोनमनेने तिच्या मुलाचे नाव वायु ठेवले आहे. सोनमने शेअर केलेल्या पोस्टचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 20 ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर मुलाच्या नामकरणाबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम देत सोनमनेच एक फोटो शेअर करत मुलाचे नाव जाहीर केले आहे. या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षावही होत आहे.