#video: कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनालीचे पहिले फोटोशूट

कॅन्सरशी लढणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकतेच वोग मॅग्झिनसाठी फोटोशूट केले. या फोटोमध्ये सोनाली बेंद्रे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेची खूण स्पष्टपणे दिसत आहे. छातीपासून पोटापर्यंत 20 इंच लांबीची ही खूण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या खुणेबाबत सोनालीने नुकत्याच एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. “माझ्या शरीरावर ही खूण कायम राहणार हे समजल्यावर मी फार तणावात होते, असे ती म्हणाली होती. आता सोनालीने ही खूण दिसेल असेच फोटोशूट केले आहे. त्याचे फोटोही तिने शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “केसांशिवाय, कमी मेकअप आणि मोठ्या खुणेसह हे फोटोशूट असेल हे आधीच ठरवले होते.

याशिवाय वोग इंडियानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनालीचे काही फोटो शेअर केले आहे. डोक्‍यावर हात फिरवताना सोनाली बेंद्रे म्हणाली की मी आता माझा नवा लूक स्वीकारला आहे, असे तिने म्हटल्याचे वोगने फोटो शेअर करताना म्हटले आहे.

दरम्यान, सोनाली बेंद्रेला मागील वर्षी जुलै महिन्यात हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. यानंतर ती अमेरिकेत उपचारांसाठी गेली. अनेक महिन्यांच्या उपचारांनंतर सोनाली भारतात परतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)