मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच ‘सोनाली कुलकर्णी’चा वाढदिवस आहे. वेगवेगळ्या भूमिकेने नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र, यावेळी कोणत्याही चित्रपटासाठी नसून इंस्टाग्रामच्या एका फोटोवरून सोनालीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. या फोटोमध्ये सोनाली कुलकर्णीने मराठमोळा लूक केला असून मंगळसूत्र चक्क उलटे घातले होते. याच फोटोवरून काही दिवसांपासून सोनालीच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. यातच लग्नाच्या चर्चांवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली.
“ लग्न घाई”
सगळ्यांनाच खूप काळजी वाटतेंय माझ्या लग्नाची…
तर मग ऐकाच.New episode of my podcast #सोनालीसांगतेऐका is
OUT NOW 👇🏻https://t.co/HthmuOiMN7@Hubhopper @hashtagconnect2 pic.twitter.com/Yv3kO2WxkQ— Sonalee (@meSonalee) May 15, 2020
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पॉडकास्टच्या माध्यमातून तिने तिच्या लग्नाची गोष्ट सांगितली. ‘माझं कोणत्याही राजकीय नेत्याशी लग्न झालेलं नाही’, हे स्पष्ट करत असतानाच सोनालीने लग्नाबाबत तिची कोणती स्वप्नं आहेत, याबद्दलही सांगितलं.
ती पुढे म्हणाली,’क्लासमेट्स’ या चित्रपटाची शूटिंग सुरू असताना सोनालीचं लग्न झालं अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मी संपूर्ण स्टारकास्टसोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होते. तेव्हा सोशल मीडियावर माझ्या लग्नाची बातमी व्हायरल झाली. कोल्हापूरच्या एका प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाशी माझं लग्न झालं, अशी ती बातमी होती.
यातच काही दिवसांनी मला माझ्या सख्ख्या चुलत बहिणीचा फोन आला. ती माझ्या लग्नाबद्दल विचारत होती. तेव्हा मला समजलं की ही अशीच पसरणारी साधी अफवा नाही. माझा मित्राने माहिती काढली तेव्हा समजलं की कोल्हापूरच्या एका विरोधी पक्षाने त्या संबंधित राजकीय नेत्याची प्रतिमा मलिन व्हावी यासाठी अशा लग्नाच्या बातम्या पसरवल्या होत्या. मात्र यात माझं नाव का गोवण्यात आलं हे मला आजपर्यंत पडलेलं कोडं आहे.” या सर्व अफवांचा खूप त्रास झाला पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे मी यातून सावरू शकले, असंही ती म्हणाली आहे.