मुंबई – जेएनयू हल्ल्याचा निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण काल संध्याकाळी जवाहलाला नेहरू विद्यापीठात दाखल झाली होती. मात्र दीपिकाच्या चाहत्यांनी सुद्धा तिच्या कालच्या भेटीचा विरोध केल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, दीपिका नंतर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका ‘सोनाली कुलकर्णी’ हिने देखील जेएनयूतील हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. सोनालीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
Can’t protect students in your own country and want to protect minorities from other countries!!!! #Irony #JNUViolence #jnuwewithyou
— Sonalee (@meSonalee) January 7, 2020
सोनालीने लिहलं कि, ”तुम्ही देशातील विद्यार्थ्यांना सुरक्षा देऊ शकत नाहीत, अन् दुसऱ्या देशातील अल्पसंख्यांना सुरक्षा देण्याच्या गोष्टी करता” असं तिने म्हंटलं आहे. दरम्यान, यावेळी सोनालीने जेएनयुवरील हल्ल्याचा एकप्रकारे निषेध करताना, सीएए कायद्यावरही टीका केली आहे.