Sonalee Kulkarni – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) मराठी सिनेसृष्टितील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते. नुकतेच गुडी पाडव्यानिमित्त अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. । Sonalee Kulkarni
हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली कमालीची सुंदर आणि मादक दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. सध्या फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
तिचा हा पाडवा स्पेशल लुक फॅन्सला खूपच आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. सोनाली नेहमीच तिचे हटके आणि पारंपरिक लूक मधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
मराठी मनोरंजन विश्वातील अप्सरा अशी सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्याने, नृत्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. घाऱ्या डोळ्यांची ही अप्सरा अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. । Sonalee Kulkarni