‘दबंग ३’ मधील सोनाक्षीचा फर्स्ट लूक व्हायरल 

मध्यप्रदेशातील महेश्‍वरमध्ये सलमान खानच्या ‘दबंग 3’चे शुटिंग सुरू झाले आहे. शुटिंगच्या ठिकाणचे फोटो रोजच व्हायरल होत आहे. आता चित्रपटातील सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आला आहे. सोनाक्षीने सोशल मीडियावर चित्रपटातील एक लूक शेअर केला आहे.

फोटो शेअर करताना सोनाक्षीने लिहले कि, रज्जो पुन्हा आली आहे. दबंग ते दबंग ३ ही घरवापसी आहे. माझा पहिला दिवस, अशी कॅप्शन तिने दिली आहे. या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी घेतली असून फारच सुंदर दिसत आहे. सोनाक्षीचा दबंग ३ मधील हा लूक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

https://www.instagram.com/p/Bv0ooDhg84J/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, ‘दबंग 3′ यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. डान्स मास्टर प्रभुदेवा हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे तर निर्मिती अरबाझ खान करत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.