युलिया वंतूरच्या जागेवर सोनाक्षीची वर्णी

करण जोहरचा “कलंक’ आणि सलमान खानबरोबरचा “दबंग 3′ मह्ये सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असणार आहे. मात्र आता तिच्याबाबत आणखीही एक खबर पुढे आली आहे. “राधा क्‍यों गोरी मैं क्‍यों काला’ या आणखी एका सिनेमामध्ये सोनाक्षी लीड रोल साकारणार आहे. या सिनेमासाठी आगोदर सलमान खानची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरची निवड झाली होती. युलियासाठी हा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा ठरणार होता.

या सिनेमाचे एक पोस्टरही रिलीज झाले होते, मात्र निर्मात्यांनी युलियाला वगळून सोनाक्षीला या सिनेमाची हिरोईन म्हणून घेण्याचा विचार फायनल केला आहे. सोनाक्षीला सिनेमाची स्क्रीप्ट ऐकवली गेली आहे. स्क्रीप्ट ऐकून सोनाक्षीने प्राथमिक तयारी दर्शवली आहे. मात्र तिने अद्याप कोणत्याही कराराच्या कागदपत्रंवर स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. “राधा क्‍यों गोरी…’ या सिनेमाची तयारी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. पण काही कारणामुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही. कास्टिंग डायरेक्‍टर विक्की सिदानावर शोषणाचे आरोप झाल्याने त्याला या प्रोजेक्‍टमधून बाहेर काढले गेले. तसेच निर्माती प्रेरणा अरोरावरही फसवणूकीचे आरोप झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.