सोनाक्षी सिन्हाचे “कोका’ गाणे रिलीज

बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या आगामी “खानदानी शफाखाना’ चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून त्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळ आहे. आता चित्रपटातील “कोका’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्याचे लिंक सोनाक्षीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे.

यापूर्वी सोनाक्षीने या गाण्याचे पोस्टर शेअर केले होते. ज्यात ती बादशाहसोबत दिसत आहे. या पोस्टरवर “कोका’ असे लिहिलेले होते. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सर्व पार्टी नंबर्सचा बाप. कोकाच्या बीट्‌सवर डान्स करण्यासाठी तयार रहा.

‘या धमाकेदार पार्टी सॉन्समध्ये बादशाहच्या “कोका’ गाण्यावर सोनाक्षी यलो सलवार सूटमध्ये डान्स करताना झळकली आहे.”खानदानी शफाखाना’मध्ये सोनाक्षी ही पंजाबमधील होशियारपुरच्या बेबी बेदी नामक सेक्‍सोलॉजिस्टची भूमिका साकारत आहे. तर पंजाबमधील सुप्रसिद्ध गायकाच्या भूमिकेत बादशाह काम करत आहे.

शिल्पी दासगुप्ता यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अन्नू कपूर, कुलभूषण खरबंदा आणि नादिरा बब्बर आदी कलाकार महत्त्वाची भूमिका साकारत आहे. दरम्यान, 26 जुलै रोजी प्रदर्शित होणारा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.