बॉलिवूडमध्ये सोनाक्षी सिन्हाने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. सोनाक्षी ही चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सतत ऍटिव्ह असते. सोनाक्षीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती चाहत्यांसोबत दोन गोष्टी शेअर करताना दिसते.
यात सोनाक्षी ही इंस्टाग्रामवर आपले 16 मिलियन फॉलोइंग झाल्याचा आनंद व्यक्त करत आहे, तर दुसरीकडे नुकताच प्रदर्शित झालेल्या “मिशन मंगल’ला मिळालेल्या यशाबद्दल तिने चाहत्यांचे आभार मानले. या व्हिडिओत ती खूपच आंनदी आणि हसतमुख दिसते.
सोनाक्षी इंस्टाग्रामवर सतत आपले व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. यापूर्वी सोनाक्षी सिन्हा “खानदानी शफाखाना’मध्ये झळकली होती. ज्यात तिने एका सेक्सॉलजिस्टची भूमिका साकारली होती.
दरम्यान, सोनाक्षी आगामी “दबंग-3′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात ती पुन्हा एकदा रज्जोच्या भूमिकेत सलमान खानसोबत आपला जलवा दाखविण्यासाठी येणार आहे.