Sonakshi Sinha Zaheer Iqbal’s Wedding Details: शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा जीवनसाथी निवडला आहे. तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत ती लग्न करणार आहे. लग्नाची बातमी आल्यापासून हे लग्न कोणत्या रितीरिवाजावर होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या कुटुंबातील एका सदस्याने एका मुलाखतीत लग्नाचा तपशील शेअर केला आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांचे जवळचे मित्र शशी रंजन यांनी ‘ई-टाइम्स’शी बोलताना लग्नाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, संपूर्ण कुटुंब सोनाक्षीच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहे. सर्वांचे आशीर्वाद झहीर इक्बाल आणि सोनाक्षी यांना आहेत.
कोर्ट मॅरेज –
हा विवाह कोर्ट मॅरेज असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. नोंदणीकृत विवाह झहीर इक्बालच्या घरी होणार आहे. जिथे दोघांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत. 23 जून 2024 ही लग्नाची तारीख आहे. सध्या कुटुंबात लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.
सोनाक्षी सिन्हाचे काका अमेरिकेतून येणार –
शत्रुघ्न सिन्हा यांचा भाऊ अमेरिकेत राहतो. सोनाक्षीच्या लग्नासाठीही ते भारतात येणार आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, सोनाक्षीच्या निर्णयावर कुटुंबीय खूप खूश आहेत.
रिसेप्शन कधी –
कोर्ट मॅरेजनंतर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी अगदी साध्या स्टाईलमध्ये पार्टी करण्याचा प्लॅन केला आहे. ते शिल्पा शेट्टीच्या बॅस्टन ॲट द टॉप रेस्टॉरंटमध्ये पार्टी देणार आहेत. जेथे सर्व पाहुणे, कुटुंब आणि मित्र सहभागी होऊ शकतात. मात्र, सोनाक्षी सिन्हा आणि तिच्या कुटुंबीयांकडून ही माहिती अद्याप अधिकृतपणे उघड करण्यात आलेली नाही.