सोनाक्षी सिन्हाच्या खात्यावर अनेक सिनेमे आणि वेबसिरीज देखील आहेत. यामध्ये भुज, बुलबुल तरंग आणि फलन सारख्या प्रोजेक्टचा समावेश आहे. आता त्यामध्ये आणखी एका सिनेमाची भर पडणार आहे. रॉनी स्क्रूवालाच्या आगामी हॉरर सिनेमात काम करायला सोनाक्षीने होकार दिला असल्याचे समजते आहे. या हॉरर सिनेमात रितेश देशमुख लीड रोलमध्ये असणार आहे.
रितेश आणि सोनाक्षी दोघांच्या हातातील सध्याचे सिनेमे पूर्ण झाल्यावर या हॉरर सिनेमाच्या कामाला सुरुवात होणार आहे. रितेश आणि सोनाक्षी प्रथमच एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट दिनेश विजानचा “स्त्री’ आणि “रुही’ या थीमवर आहे. पण थोडा वेगळा आहे, असे समजते आहे. या चित्रपटाचे शूटिंग यावर्षी सप्टेंबर महिन्यात राजस्थानमध्ये सुरू होईल.
सोनाक्षी सध्या एका वेबसिरीजच्या कामात आहे. तर रितेश देशमुख देखील शशांक घोषच्या एका सिनेमाच्या कामात आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी चित्रपटसृष्टीत अनेक मोठे चित्रपट दिले आहेत. यात केदारनाथ, उरी सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विक्की कौशलचा अश्वत्थामा, मेजर ध्यानचंदचा बायोपिक आणि पिप्पा या चित्रपटांच्या निर्मितीचे कामही लवकरच सुरू होणार आहे.