कौन बनेगा करोडपतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून सोनाक्षी ‘ट्रोल’

मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या भलत्याच कारणामुळे चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल आहे, त्याला कारणही तसच आहे. कौन बनेगा करोडपतीमध्ये ती रुपा देवी यांच्या मदतीसाठी आली होती. यावेळी अमिताभ यांनी त्यांना एक रामायणातील प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर माहिती नसणे हे आपण समजू शकतो. मात्र, जे उत्तर सोनाक्षीने दिले, त्याची चांगलीच टींगल सुरू झाली आहे.

रामायणानुसार हनुमानाने कोणासाठी संजीवनी बुटी आणली होती ? असा केबीसीतला प्रश्न होता. याला चार पर्याय देण्यात आले होते. सुग्रीव, लक्ष्मण, राम आणि सिता असे हे चार पर्याय होते. मात्र सोनाक्षी मॅडम सिता या पर्यायाचा विचार करु लागल्या. या उत्तरामुळे रुपा देवी फसू नयेत म्हणून लाईफ लाईन घेण्याचा सल्ला अमिताभ बच्चन यांनी दिला.

अखेर एक्सपर्टच्या मदतीने हे उत्तर देण्यात आले. याच कारणामुळे सध्या सोनाक्षीला ट्रोल केले जात आहे. खरतर अखंड रामायणातील सर्व पात्रे सोनाक्षीच्या घरातच आहे. कारण तिच्या काकांची नावे आहेत राम, लक्ष्मण, भरत आणि वडिलांचे नाव आहे शत्रुघ्न. तिच्या भावांची नावे आहेत लव आणि कुश. तिच्या या अज्ञानावर नेटकऱ्यांनी तिची भरपूर खिल्ली उडवली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)