सोनाक्षी सिन्हाने घेतला 4 बीएचके फ्लॅट

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड सेलिब्रिटीज रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहेत. हृतिक रोशन आणि जान्हवी कपूरने जुहूमध्ये फ्लॅट घेतले आहेत. जॅकलीन फर्नांडिस देखील मुंबईतल्या नवीन फ्लॅटमध्ये रहायला गेली आहे. आता सोनाक्षी सिन्हाने देखील बांद्रामध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे, असे समजते आहे. 4 बीएचकेची ही अपार्टमेंट बांद्रा रिक्‍लमेशन या अतिशय उच्चभ्रू वसाहतीत आहे.

वयाची तिशी ओलांडायच्या आगोदर स्वतःच्या कष्टाच्या पैशातून आलिशान घर घ्यायचे असे आपले खूप पूर्वीपासूनचे स्वप्न होते. वयाची तिशी तर दोन वर्षांपूर्वीच ओलांडली असली तरी आपल्या पैशातून घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे सोनाक्षीने सांगितले. सध्या सोनाक्षी वडील शत्रुघ्न सिन्हा आणि आई पूनम सिन्हा यांच्यासह जुहूमधील बंगल्यात रहात आहे. आता देखील ती या जुन्याच घरी राहणार आहेत. नवीन घरात राहायला जाण्याचा तिचा कोणताही विचार नाही.

सोनाक्षी उत्तम पेंटर आहे. जुहूतील बंगल्यात तिच्या चित्रकलेसाठी एक स्वतंत्र खोली आहे. आता नवीन फ्लॅटमध्ये देखील ती आपली कला जोपासण्यासाठी एक स्वतंत्र खोली राखून ठेवेल, असा अंदाज आहे. सलमानबरोबर “दबंग 3′ मध्ये ती होती. आता अजय देवगण आणि संजय दत्तबरोबर “भुज : द प्राईड ऑफ इंडिया’मध्येही ती असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.