सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती आपले लेटेस्ट फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करत असते. तिच्या फोटोंना खूप लाईक मिळत असले, तरी पूर्वी तिच्या जाडेपणावरून तिला ट्रोल केले जात असे.
लॉकडाऊनच्या काळामध्ये घरांमध्येच थांबण्याची आपल्याला सवय झाली असल्याचे तिने म्हटले आहे. अलिकडेच तिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
त्यामध्ये ती बारीक झाली असल्याचे दिसते आहेच. पण तिच्या चेहऱ्यावरही वेगळेच तेज आले आहे. तिच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे ती ओळखू देखील येत नाही आहे. घरी राहून व्यायाम करणे हा आपला छंद झाला आहे आणि त्यामुळेच आपल्यात बदल झाल्याचे तिने सांगितले.
तिच्यात झालेला आमूलाग्र बदल खूप स्पष्टपणे लक्षात येतो आहे. तिच्या चेहऱ्यात जो वेगळेपणाजाणवतो आहे, त्यावरून अनेक फॅन्सनी तिला कॉम्प्लिमेंटही दिल्या आहेत.