Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनाक्षीने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. अलीकडेच ती ‘हिरामंडी’मध्ये झळकली. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी सिव्हीज मॅरेज केले आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले आहेत. आता दोघेही सुट्टीवर गेले आहेत. हे कपल इटलीतील मिलानमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. सोनाक्षीने इंस्टाग्रामवर येथीलअनेक फोटो शेअर केले आहेत.
सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनाक्षी तिच्या पतीसोबत सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे. यासोबत तिने विदेशात राहत असलेल्या लग्झरी हॉटेलची झलक देखील दाखवली आहे. काही मित्र देखील सोनाक्षी आणि झहीरसोबत दिसत आहेत. काही फोटोंमध्ये सोनाक्षी आणि झहीर इक्बाल रोमांटिक होताना दिसत आहेत. Sonakshi Sinha |
View this post on Instagram
शेअर केलेल्या क्लिपमध्ये सोनाक्षीच्या हातातून एक पक्षी काहीतरी खाताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोघेही चर्चमध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मिलान नोव्हेंबर, 2024.” सुट्टीवर गेलेले हे जोडपे मिलानपूर्वी टस्कनीमध्ये होते या ठिकाणाचीही झलक त्यांनी दाखवली होती. Sonakshi Sinha |
दरम्यान, सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षीने झहीर इक्बालसोबत 23 जून रोजी मुंबईत लग्न केले. सलमान खानच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले, तिथेच या दोघांची भेट झाली. झहीर इक्बालचे वडिल मोठे बिझनेसमन आहेत.
सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, ती ‘तू है मेरी किरण’मध्ये पती झहीरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. झहीर आणि सोनाक्षी ‘डबल एक्सएल’मध्येही एकत्र दिसले होते.