Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच झहीर इकबालशी लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर आता सोनाक्षी सिन्हाच्या प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्याचं झालं असं की, वेडिंगनंतर सोनाक्षीचा हॉस्पिटलमध्ये जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अखेर या सगळ्यावर सोनाक्षीने मौन सोडले आहे.
एका मुलाखतीत सोनाक्षी म्हणाली की, “मला लग्नानंतरही सगळं आधीसारखंच वाटते आणि हीचांगली गोष्ट आहे. माझं आयुष्य लग्नापूर्वी खूप स्थिर होतं आणि आता लग्नानंतरही तसेच आहे. लग्नानंतर एकच बदल झाला आहे की, आता मी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही कारण तिथून बाहेर पडल्यानंतर लोकांना वाटते की मी प्रेग्नेंट आहे, हाच फरक आहे.” Sonakshi Sinha |
दरम्यान, सोनाक्षी सिन्हा नुकतीच संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी या वेबसिरीजमध्ये फरीदानची भूमिका साकारताना दिसली होती. यातील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सोनाक्षी लवकरच रितेश देशमुख आणि साकिब सलीमसोबत काकुडामध्ये दिसणार आहे.
हा चित्रपट १२ जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय हिरामंडीच्या दुसऱ्या पार्टची देखील काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आल्याने यातही ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीर : चार दहशतवाद्यांचा खात्मा, तर दोन जवान शहीद ; अकोल्यातील २४ व्या वर्षी जवानाला वीरमरण