हेलनच्या “मुंगडा’वर सोनाक्षीचा डान्स

बॉलीवूडकमध्ये “धमाल’ची तिसरा भाग “टोटल धमाल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील गाणीही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. या चित्रपटातून “पुकार’ चित्रपटानंतर माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी 18 वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांना भेटण्यास सज्ज झाली आहे. याशिवाय अजय देवगण, जॉनी लिव्हर, रितेश देशमुखसारखे अभिनेते या चित्रपटात झळकणार आहेत.

टोटल धमालमध्ये सोनाक्षी सिंह एका आयटम डान्स करताना दिसणार आहे. 1978मधील हेलनच्या “मुंगडा’ या गाण्यावर सोनाक्षी थिरकणार आहे. मुंगडा हे गाणे टोटल धमालमध्ये रिक्रिएट करण्यात आले आहे. याआधीचे टोटल धमालधील “ये ये पैसा’ हे गाणे 1980 मधील “कर्ज’ चित्रपटातील रिक्रिएट व्हर्जन आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या चित्रपटात जुन्या गाण्यांचे रिक्रिएट व्हर्जन करण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. सत्यमेव जयतेमधील दिलबर दिलबर, लुका-चुप्पी मधील एक खबर छपवा दो अखबार में, हैप्पी फिर भाग जाएगीमधील मेरा नाम चिन चिन चू यासारखी गाणी रिक्रिएट करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)