बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल झाला असून असंख्य कमेंटस् येत आहेत.
View this post on Instagram
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोत सोनाक्षी पांढऱ्या रंगाचा बोट-नेक ब्लाऊजमध्ये दिसत आहे. सोनाक्षीने केस मोकळे सोडून आणि कमी मेकअप करत हा लुक पूर्ण केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, “पीक-ए-बू .. मैं तुम्हें देखती हूं!’
View this post on Instagram
दरम्यान, अलीकडेच सोनाक्षीने शेअर केले होते की, ती आता प्रमाणित स्कूबा डायव्हर आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर फोटोंचे स्ट्रिंग पोस्ट केले होते. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सोनाक्षी “भुज : द प्राइड ऑफ इंडिया’मध्ये झळकणार आहे. सत्य घटनेवर आधारित क्राइम ऍक्शन चित्रपटात तिच्यासोबत अजय देवगण, संजय दत्त, नोरा फतेही आणि शरद केळकर हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.