सोना मोहापात्राला सलमानच्या फॅनकडून जीवे मारण्याची धमकी

मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका ‘सोना मोहापात्रा’ला अभिनेता सलमान खानच्या एका चाहत्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोना मोहापात्रा ही नेहमीच सामाजिक माध्यमांवर स्वतःची मते मोकळेपणाने मांडत असते. तसेच बॉलिवूडमधील न पटणाऱ्या कलाकारांविरोधात सुद्धा ती ट्विटर अकाउंटवरून आपले मत मांडत असते.

दरम्यान, सोनाने काही दिवसांपूर्वी असंच एक वादग्रस्त ट्विट सलमान खान विरोधात केलं होत. मात्र, तिने केलेल्या या ट्विटने आता एक वेगळेच वळण घेतले आहे. या ट्विटमुळे सलमानच्या एका चाहत्याने सोनाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तिने आलेल्या धमकीचा स्क्रिनशॉट ट्विटवर शेअर केला असून, याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.”वाईट वर्तणुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हिरोच्या चाहत्यांकडून मला अशाप्रकारे धमकावणारे मेसेज नेहमीच येत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मानवी मूल्यांचा शत्रू असलेला हा हिरो सध्या ‘भारत’ हे शीर्षक घेऊन सर्वत्र मिरवत आहे”. असं सोनाने म्हंटल आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.