सोलापूरात डोक्यात दगड घालून जन्मदात्या आईचा निर्घृण खून

सोलापूर – सोलापुरातील बार्शीमध्ये जन्मदात्या आईचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये ही घटना घडली आहे. खून केल्यानंतर मुलगा पसार झाला आहे. पोटच्या मुलानेच केलेल्या या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडली आहे.

रुक्मिणी नागनाथ फावडे (वय 45 रा. वाणी बार्शी) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे. श्रीराम नागनाथ फावडे (वय 21) असे खून केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाविरोधात सोलापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मुलाचे घरात पैशावरुन नेहमी वाद होत होते. मृत महीला रुक्मिणी व तिचा मोठा मुलगा श्रीराम हे दोघेजण घरात नेहमी भांडण होत असल्याने वेगळे राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मोठा मुलगा श्रीराम हा सध्या मुंबई येथे गेल्याचे त्याच्या मोबाईल स्टेटस वरुन समजले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच घरातील सर्व वापरण्याचे कपडे त्याने नेल्याचे लक्षात आले. यापुर्वीही त्याने आईस व भावास मारहाण केली होती त्यामुळेच त्यानेच आईचा डोक्यात दगड घालुन जिवे ठार मारले असा संशय आहे. पोलिस पुढिल तपास करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.