Somnath Suryavanshi । मराठवाड्यातील परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूने राज्यभरात एकच गोंधळ उडाला होता. या प्रकरणाने राजकीय वातावरण देखील तापले होते. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात आला होता.मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. मात्र आता या प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले त्याच्या प्राथमिक अहवालावरून ,पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी चा मृत्यू झाल्याचे उघड आल्यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जवळपास दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्र्वर तूरनर,कर्मचारी सतीश दैठणकर,मोहित पठाण,राजेश जठाल यांचे निलंबन करण्यात आले आहे .
10 डिसेंबर 2024 रोजी नेमक काय घडलं ? Somnath Suryavanshi ।
परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.
आंदोलकांनी केल्या 15 मागण्या Somnath Suryavanshi ।
परभणी ते मुंबई लाँग मार्च दरम्यान नाशिक येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकारी आंदोलकांना भेटले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आंदोलकांच्या भेटीनंतर 15 मागण्या मान्य करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. आंदोलकांकडून मागण्या मान्य करण्याबाबत देण्यात एक महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.
‘या’ आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
1 . दत्ता सोपान पवार याची नार्को टेस्ट व त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे .
2.आंदोलन करणारे तसेच सोमनाथ सूर्यवंशीला जीवे मारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून कायमस्वरूपी कमी करून त्यांच्यावर मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करणे
3 .आंदोलनकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे .
4 .बी आर आंबेडकर असे नाव असलेल्या मोटार सायकल फोडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यालासुद्धा निलंबित करून कारवाई करणे .
5 .गठीत केलेल्या न्यायालयीन चौकशीचे न्यायाधीश आम्हास मान्य नाही .
6 .आंदोलनकर्त्यांची आरोग्य तपासणी करणाऱ्या आरोग्य अधिकारी व जेलर यांच्यावर कारवाई करून निलंबित करणे
7.कलम 176 1 ( अ)सीआरपीसी अन्वये या प्रकरणाची चौकशी करावी
8.परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही जप्त करून ते तपासावे .
9 .सोमनाथ सूर्यवंशी च्या कुटुंबीयांना सरकारने तातडीने एक कोटी रुपये आर्थिक मदत करावी .तसेच आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांनाही मदत करून दोन्ही कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्यात यावी .
10.आंबेडकर अनुयायांना मारहाण करणारे पोलीस कर्मचारी यांना निलंबित करून अनुयायांना शासनाने दहा लाख रुपयांची मदत करावी
11 .पोलिसांनी केलेल्या कोंबिंग कारवाई मध्ये जखमी झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करावी .
12.दोषी अधिकारी अंमलदारांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे
13.पोलिसांसोबत सामील होऊन आंबेडकरीत युवकांवर मारहाण करणाऱ्या तरुणांना अटक करून ॲट्रॉसिटी नुसार कारवाई करावी .
14 .सोमनाथ सूर्यवंशीचे स्मारक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा .
15. परभणीतील उपोषण मैदानाला लोकनेते विजय वाकोडे यांना समाजभूषण पुरस्कार मरणोत्तर देण्यात यावा .