थोडीशी हुरहूर… अन्‌ चेहऱ्यावर भिती; दहावी परीक्षेस प्रारंभ

कराड  – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी परिक्षेस शुक्रवार, दि. 1 मार्चपासून प्रारंभ झाला. दहावीचे वर्ष सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वाचे असल्याने परीक्षेसाठी सर्व परिक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहिलाच पेपर असल्याने या परीक्षेचे टेन्शन मुलांबरोबरच पालकांच्या चेहऱ्यावरही दिसत होते.

दहावीच्या परीक्षेसाठी तालुक्‍यातून 10103 एवढे विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परीक्षा अकरा वाजता सुरु होत असल्याने तसेच पहिलाच पेपर असल्याने सकाळी 9.30 वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गर्दी केली होती. संबंधित विद्यालयांकडून आलेले पालक व विद्यार्थी यांना परीक्षेच्या अनुषंगाने सूचना करण्यात येत होत्या. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेण्यात आली. मुलांना पेपरसाठी वेळेत पोहोचता यावे यासाठी कराड बसस्थानकाकडून जादा बसेसची सोय करण्यात आली होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.