पिंपरी-चिंचवड : करोना रुग्णवाढीला काहीसा ब्रेक

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोनाबाधितांचा आकडा रोज वाढत होता. करोना रोज एक नवा उच्चांक स्थापित करत होता. परंतु सोमवारी मात्र या वाढीस काहीसा ब्रेक लागला आहे. सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत गेल्या 24 तासांमध्ये 2196 रुग्ण आढळले आहेत. तर 16 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार गेल्या 24 तासांमध्ये 2196 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 44 रुग्ण हे शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत आहेत. सोमवारी आढळलेल्या शहरातील 2152 रुग्णांमुळे शहरातील आतापर्यंतची करोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 53 हजार 80 इतकी झाली आहे.

तसेच करोनामुळे झालेल्या 16 मृत्यूंपैकी 14 रुग्ण शहरातील रहिवासी होते तर दोन रुग्ण शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत होते. आतापर्यंत शहरातील 2079 आणि शहराबाहेरील 848 अशा एकूण 2927 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोमवारी लक्षणे नसलेल्या 1815 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे आतापर्यंत करोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 28 हजार 450 इतकी झाली आहे. शहरात सध्या 22551 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी केवळ 3804 रुग्ण रुग्णालयात असून 18747 रुग्ण घरात राहून उपचार घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.