‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे

होळीच्या शुभेच्छा देताना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून धनंजय मुंडे यांनी एक ट्विट केले असून याद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या ट्विटमध्ये धनंजय मुंडे यांनी सलमान खान आणि रविना टंडन यांच्या पत्थर के फूल या चित्रपटातील “कभी तू दीवाना लगता है कभी अनाडी लगता है…” या गाण्याची चाल वापरत मोदींवर निशाणा साधला आहे. ते लिहितात, “कभी तू फकीर लगता है कभी आवारा लगता है कभी तू चायवाला लगता है कभी चोर चौकीदार लगता है…
हमेशा अपना रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं! बुरा ना मानो होली है…” धनंजय मुंडे यांनी होळीच्या निमित्ताने पंतप्रधानांवर केलेल्या टीकेचे आता भाजपकडून कसे प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.