काही तरी घडतंय! शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दिल्लीत पुन्हा भेट ;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात आज दिल्लीत दुसरी बैठक शरद पवार यांच्या  निवासस्थानी सुरू आहे. त्यांच्या या भेटीमुळे राष्ट्रीय स्तरापासून ते राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी दोघांची पहिली बैठक मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर झाली होती.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पीके अर्थात प्रशांत किशोर पवारांच्या घरी १२ जून रोजी शुक्रवारी पोहचले होते. तिथे या दोघांमध्ये विस्तृत चर्चाही झाली. प्रशांत किशोर यांनी शरद पवारांच्या घरी जेवणही घेतले. या भेटीचे वृत्त समोर आले आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या भेटीमुळे अनेक अंदाज वर्तवले जाऊ लागले, अफवांचेही पीक आले.

या बैठकीसंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही या भेटीला वैयक्तिक स्वरुपाची भेट असल्याचे सांगत अफवांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

प्रशांत किशोर यांनीदेखील या भेटीला सद्भावना भेट असेच म्हटले. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तृणमूल कॉंग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शविणाऱ्यांना धन्यवाद देण्यासाठीच्या ‘धन्यवाद यात्रे’चा हा एक भाग असल्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.