सध्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशलमधील “गहिऱ्या दोस्ती’ची चर्चा सिनेसृष्टीत प्रत्येकाच्याच तोंडून ऐकायला मिळत आहे. अनेकदा हे दोघे एकत्र हॅंगआऊट करताना दिसून येतात. मध्यंतरी ही जोडी एकत्र डिनरवर गेलेले दिसून आले.
कॅट आणि विकीची मैत्रीण आरती शेट्टीच्या डिनरपार्टीमध्ये हे दोघे सहभागी झाले होते. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनविषयीची चर्चा सुरु झाली. अर्थात दोघांनीही त्यांच्यात अफेअर वगैरे सुरू असल्याचे म्हटलेले नाही.
दोघांनीही अशा प्रकारच्या बातम्यांना नेहमीच अफवा म्हणून धुडकावून लावत आम्ही दोघं चांगले मित्र असल्याचे सांगितले आहे.
मात्र सिनेवर्तुळातील सूत्रांच्या मते, या दोघांमध्ये काही तरी नक्कीच शिजतं आहे. तशातच आता कॅट आणि विक्की हे दोघेही एका चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा आहे.
या चित्रपटाच्या निमित्तानं या “लुका छुपी’ला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे, ही जोडगोळी तेव्हा उघडपणानं फिरताना दिसेल. त्यानंतर ही मैत्री केवळ मैत्रीच राहते की तिचे नात्यात रूपांतर होते हे येणारा काळच सांगेल. !
View this post on Instagram