सोमेश्वरला आजी माजी सैनिकांचा चीनविरुद्ध निषेध

सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – बारामती तालुका आजी माजी सैनिक संघ ,सोमेश्वरनगर येथे भारत -चीन सीमेवर झालेल्या चकमकीत शहीद जवानाना श्रद्धांजली व चीनी वस्तु न घेण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम पार पडला .

बारामती तालुक्यातुन ३०० सैनिक सदस्य असलेल्या संघटनेच्या कार्याचा आढावा घेत तक्रार निवारण कमिटी चे अध्यक्ष व माजी सैनिक ॲड. गणेश आळंदीकर यानी प्रास्तावीक करुन चीनच्या हल्ल्याबाबत माहीती दिली. व सर्व जवानाना शपथ घेण्याचे आवाहन केले. त्यावेळी “मी ईथुनपुढे चीनी माल खरेदी करणार नाही ,मोबाईल मधील चीनी ॲप काढून टाकणार माझ्यासह कुटुंबियाना देखील चीनी वस्तु घेण्यापासून परावृत्त करेन ,आपल्या शहीद सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयाना शक्यतोवर मदत करेन” अशा प्रकारची शपथ सर्व सैनिकानी घेतली. कोरोना च्या पार्श्वभूमी वर फक्त 50 सैनिक या कार्यक्रमाला आले होते .

सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर ,उपाध्यक्ष विठ्ठल भापकर ,कार्याध्यक्ष अनिल शिंदे,गणेश आळंदीकर , संस्थापक जगन्नाथ लकडे ई. नी यावेळी मनोगत व्यक्त केले . राष्ट्रीय सेवा संघाचे शाखाप्रमुख केतन कुलकर्णी यानी मनोगतात प्रत्येकाने चीनी लोकांचे मोबाईल पाच हजाराचे जरी घेतले नाहीत तरी देशातील १३० कोटी जनतेमुळे किमान सात आठ लाख कोटी चे नुकसान होईल असे सांगीतले .

तालुक्यातुन व परिसरातुन सैनिक हजर झाले. प्रा पी एम गायकवाड ,गोवींद महाराज चव्हाण ई नी मनोगते व्यक्त केली . बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप ,पत्रकार विनोद गोलांडे , तुषार धुमाळ ई नी देखील शहीद जवानाना पुष्पहार घालुन श्रद्धांजली अर्पण केली .आभार कार्याध्यक्ष अनिल शिंदे यानी मानले .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.