कळस दर्शन घेऊन केले समाधान व्यक्त
सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) – बारामती तालुक्यातील सुप्रसिद्ध प्रती सोरटी सोमनाथाचे रूप मानले जाणारे सोमेश्वराची श्रावण सोमवार यात्रा यात्रा विधिवत व मोजक्या लोकांच्या संपन्न झाली. श्रावण महिन्यातील हा १७ऑगस्ट रोजी असणारा शेवटचा सोमवार असून या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांची ची लाखोंच्या संख्येत गर्दी होत असते, मिठाईवाले पाळणे घरगुती गृह उपयोगी साहित्यांची स्टॉल व विविध प्रकारच्या पाळणे यांनी हा संपूर्ण परिसर सजलेला व गजबजलेला असतो. परंतु, यावर्षी जगात हाहाकार असणाऱ्या कोरोनाच्या संकट असल्याकारणाने प्रशासन व जिल्हा अधिकारी यांनी देऊळ बंद व यात्रा रद्दच्या आदेशानुसार सर्वत्रच मंदिर बंद आहे.
बारामतीतील सोरटी सोमनाथ करंजे येथील मंदिर ही बंद आहे. यावर्षी भरणारी मोठी यात्राही रद्द करण्यात आली असल्याची सूचनाही देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व अध्यक्ष विनोद भांडवलकर यांनी दिली होती.
दरवर्षी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार दिवशी ची यात्रा लाखो भाविकांना च्या समवेत सोमेश्वर पालखी सोहळा ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्य यांचा गजररात मोठ्या थाटात मंदिर व मंदिर परिसरात निगत असतो परंतु याच वर्षी असलेल्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्यासह मानकरी व पुजारी यांच्या समवेत हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे दुपारच्या समय संपन्न झाला आणि खोमणे भेटही मोजक्याच लोकांच्यात विधिवत पद्धतीने हा भेटीचाही कार्यक्रम शांततेत झाला.
“श्रावणातील पूर्ण महिना बर सोमेश्वराची मनोभावे पूजा व आरती करणारे ग्रामस्थ सध्या सोमेश्वर मंदिरात चे कळस दर्शन शिक्षण घेऊन समाधान व्यक्त करत होते. तसेच सोमेश्वरनगर व पंचक्रोशीतील नागरिक कळस दर्शन तरी व्हावे म्हणून येत होते. दर सोमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात भरणारा दरवर्षीचा सोमेश्वर पालखी सोहळा पाहिला न मिळाल्याने येणारे शिवभक्त करंजे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी खंत व्यक्त केली.
-सचिन पाटोळे (करंजे ग्रामस्थ)
श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी भाविकांची गर्दी शेवटच्या गर्दी होऊ नये तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे त्यांचे पोलीस कर्मचारी,करंजे पोलिस पाटील राजेंद्र सोनवणे यांनी मंदिर परिसरात एकही भाविक येऊ नये म्हणून काळजी घेत होते व त्यांना घरी राहूनच दर्शन व पूजा करण्याचे सांगत होते.
त्याचप्रमाणे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्य सेवक ,सेविका, आशा वर्कर यांनीसुद्धा त्या ठिकाणी स्टॉल लावला होता त्यामुळे आलेल्या मोजकी लोकांचीही त्यांच्यामार्फत तपासणी करूनच त्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्यात असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी फिरोज मुलांनी यांनी दिली.