सर्वोच्च ऊस दर देण्याचा “सोमेश्‍वर’कडून मानस

वाघळवाडी – गतहंगामात गाळप असलेल्या उसाची तोडणी वाहतूक खर्च वजा जाता निव्वळ एफआरपी प्रति मे. टन 2 हजार 774 रुपये होती; परंतु सोमेश्‍वर सहकारी कारखान्याने आजअखेर बेसल डोस अनुदानासह प्रति मे.टन 2 हजार 824 रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहेत. तसेच गतवर्षीप्रमाणे जिल्ह्यात सर्वोच्च ऊस दर देण्याचा संचालक मंडळाचा मानस असून निश्‍चित आम्ही जिल्ह्यात सर्वोच्च ऊसदर देण्यास प्रयत्नशील राहू, असे आश्‍वासन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.

श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन समारंभ शुक्रवारी (दि. 2) बारामतीचे सहायक निबंधक एस. एस. कुंभार यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अधिकारी व कामगारांच्या उपस्थितीत पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. पुरुषोत्तम जगताप म्हणाले की, गतवर्षी प्रमाणे येणारा हंगाम सुरळीत व चांगल्या प्रकारे पार पाडण्याची कारखान्यातील अंतर्गत दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून येणारा गळीत हंगाम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद संचालक कामगार व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडू. ज्या सभासदांच्या लागण नोंदी देणे राहिले असतील त्या सभासदांनी शनिवार (दि. 3) पर्यंत कारखान्याच्या शेतकी विभागाशी संपर्क साधून आपल्या नोंदी द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.