इरफान खान विषयीच्या काही अज्ञात गोष्टी

बॉलीवूडचा अभिनेता इरफान खानचे निधन ही सध्याच्या कोरोनाच्या शोककाळातील सर्वांत दुःखद बातमी ठरली. 13 मार्च रोजी त्याचा “अंग्रेजी मीडियम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दीर्घकाळापासून एका दुर्धर व्याधीशी लढा देत असूनही या चित्रपटात इरफानने साकारलेला अभिनय हा प्रशसंनीय होता.

इरफानचं आयुष्य आणि त्याचा प्रवास हा रंजक होता. अनेकांना माहीत नसेल की एकेकाळी इरफान एअर कंडिशनर दुरुस्तीचे काम करत होता. विशेष म्हणजे बॉलीवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना याच्या घरातील एअर कंडिशनरची दुरुस्तीही इरफानने केली होती.

गंमत म्हणजे, मुंबईमध्ये आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी म्हणून इरफानने एसी रिपेअरिंगचे काम केले. या कामाची सुरुवात केल्यानंतर त्याने सर्वप्रथम ज्यांच्या घरांमधील एसी दुरुस्त केले त्यामध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बंगल्याचा समावेश होता. 

आणखी एक अशीच गोष्ट म्हणजे, इरफान यांचा शेवटचा चित्रपट “अंग्रेजी मीडियम’ असल्याचे सांगितले जाते; परंतु अनेकांना हे माहीत नाही की इरफानचा एक चित्रपट अद्यापही प्रदर्शित व्हायचा आहे. या चित्रपटाचे नाव आहे “मंत्र ः सॉंग ऑफ स्कॉर्पियन्स’. हा एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्‍ट आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे.

हा चित्रपट राजस्थानातील एका महिलेच्या जीवनावर आधारलेला आहे. ही महिला गाणी म्हणून रुग्णांवर इलाज करत असते. पण कालांतराने एक व्यक्‍ती तिच्या आयुष्यात विष कालवतो. त्यानंतर ती आपल्या या जादुई गाण्याच्या शोधासाठी बाहेर पडते. अनुप सिंह दिग्दर्शित या चित्रपटात गोलशिफ्ते फरहानी ही इराणमधील प्रख्यात अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच वहिदा रहमान यांचाही यामध्ये एक छोटा रोल आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.