पुणे – मंकी हिल ते कर्जतदरम्यान अप मार्गावर देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परिणामी, काही रेल्वे गाड्या रद्द असणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.
पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर दि. 30 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर, सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर दि. 23 ते 25 जानेवारी आणि दि. 30 जानेवारीदरम्यान, पंढरपूर-सीएसएमटी पॅसेंजर 24 ते 26 जानेवारी आणि 31 जानेवारीदरम्यान रद्द केली आहे. मुंबई-बीजापूर एक्स्प्रेस दि. 21, 22 आणि 26 ते 29 जानेवारीदरम्यान, बीजापूर-सीएसएमटी एक्स्प्रेस दि. 21 ते 23 आणि दि. 27 ते 30 जानेवारीदरम्यान, दौंड-साईनगर शिर्डी-दौंड पॅसेंजर दि. 21 ते 30 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात येणार आहे.
भुसावळ-पुणे-भुसावळ एक्स्प्रेस दि. 30 जानेवारीपर्यंत मनमाड-दौंडमार्गे धावेल. तर सीएसएमटी-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस दि. 30 जानेवारीपर्यंत पुण्यापर्यंत धावणार असून, पुण्यातूनच सुटणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मंकी हिल ते कर्जत मार्गावरील बोर घाटात सुरू असणारे देखभाल-दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दि. 30 जानेवारीपर्यंत या कामाची मुदत वाढवली आहे, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे जनसंपर्क अधिकारी ए.के. जैन यांनी सांगितले.