Dipika Kakar And Sonalee Kulkarni | मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने खास मैत्रिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती अभिनेत्री म्हणजे दीपिका कक्कर. दीपिकाला स्टेज-2 कर्करोग झाला होता, तिच्यावर शस्त्रक्रिया झाली असून आता तिची तब्येत ठीक असल्याचे दीपिकाने सांगितले. त्यानंतर आता सोनाली आणि दीपिकाची भेट झाली आहे.
दीपिकाने सोनालीसोबतचे खास फोटो शेअर करत खास कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली आहे. यावेळी दोघीही खूप आनंदी असल्याचे दिसत आहे. तिची स्टोरी रिपोस्ट करत सोनालीनेही आपले प्रेम व्यक्त केले आहे.
“सोनाली आणि दीपिका KV1 देहू रोडपासून आतापर्यंत… काही नाती कधीच बदलत नाहीत, काळजी, प्रेम, उबदारपणा कधीच बदलत नाही… आपण कितीही वेळा भेटलो तरी… बंधन तसेच आहे. कायम माझ्यासोबत राहण्यासाठी सोनाली खूप धन्यवाद… तुला खूप प्रेम…” अशी पोस्ट दीपिकाने केली आहे.
दीपिकाची ही स्टोरी सोनालीने इन्स्टाग्रामवर रिशेअर केली असून तिनंसुद्धा कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘प्रेम…मला तुझा खूप अभिमान आहे…तुझी कायमची चिअरलिडर’ या फोटोंवरून सोनाली आणि दीपिका बालपणीच्या मैत्रिणी असल्याचं दिसून येत आहे. Dipika Kakar And Sonalee Kulkarni |
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिला ‘महाराष्ट्राची अप्सरा’ म्हणून ओळखले जाते. तिने मितवा, धुरळा, हंपी, हिरकणी, पोश्टर गर्ल, पांडू, झिम्मा, बकुळा नामदेव घोटाळे, नटरंग या चित्रपटांमध्ये काम केले आहे. Dipika Kakar And Sonalee Kulkarni |
हेही वाचा:
Satara News : कराड तालुक्यात १०१ ग्रामपंचायतीत ‘महिलाराज’