डोंगराचा काही भाग कोसळला

आतवण गावातील प्रकार : घराला मातीचा वेढा, रस्त्यावरही माती पसरली
पवनानगर – पवन मावळातील आतवण गावाच्या हद्दीत डोंगराचा काही भाग कोसळल्याने डोंगरावरील मातीच्या ढिगांनी खालील घराला वेढा घातला. या घटनेमुळे डोंगराखाली राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या कोसळलेल्या मातीमुळे एका घराला मातीचा वेढा बसला. तर रस्त्यावरही सगळीकडे माती पसरली होती. सुदैवाने या घटनेत कोणलाही गंभीर इजा झाली नाही.

पवनमावळातील आतवण गावच्या हद्दीत रस्त्यावर व वनखात्याच्या हद्दीतील डोंगराच्या बाजूला संजय बाळू टाकवे व चंद्रकांत टाकवे यांची घरे आहेत. रविवारी सकाळी डोंगरावरच्या मातीचा ढीग कोसळल्याने घराला मातीचा वेढा बसला तर माती संपूर्ण रस्तावर पसरली. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. सुदैवाने केवळ माजीचे ढीगच खाली आले डोंगरावरचा सुटलेला भाग घरावर पडला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. घटना स्थळी तलाठी रवी मुरूत व वनखात्याच्या लोकांनी जाऊन पाहणी केली. वन विभाग आणि संयुक्‍त वनव्यवस्थापन समितीच्या वतीने संजय टाकवे व चंद्रकांत टाकवे यांना तत्काळ मदत करण्यात आली मातीचा ढिगारा घराच्या भिंतीवर आल्याने दोन घराचे नुकसान झाले.

याबाबत महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले आहे. परंतु ही नुकसान भरपाई मिळणार असल्याने येथील जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडे सदर कुटुंबाना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यानंतर याची दखल घेऊन भेगडे यांनी वनविभागाला सूचना दिल्या लगेच आतवण वनविभागाच्या संयुक्त वनविभाग समितीच्या वतीने संजय टाकवे यांना 15000 तर चंद्रकांत टाकवे यांना भारतात 5000 रूपयाची तातडीने मदत केली. याबबातचे धनादेश टाकवे यांना देण्यात आले.

यावेळी पुणे सहाय्यक वनरक्षक संजय मारणे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, वनपाल मंगेश सपकाळे, सागर चुटके, अरुण भालेकर, गणेश झिरपत, संदिप वानगुडे, विरेंद्र लंकेश्‍वर, गणेश धानिवले, सरपंच वसंत म्हसकर, गणेश ठाकर आदी उपस्थित होते. याबाबत सोमनाथ ताकवले म्हणाले की, वनविभागाच्या हद्दीतील डोंगराचा काही भाग कोसळल्याने घराचे थोड्या प्रमाणात नुकसान झाले असून संयुक्त वनव्यवस्थापन समिती आतवण माध्यमातून नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.