राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे काही आमदार लवकरच भाजप प्रवेश करणार

भाजप आमदार प्रसादर लाड यांचा दावा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांच्या पक्षांतराची चर्चा जोरात सुरू आहे. सत्तेतील असो वा विरोधी पक्षाचे नेते असो येत्या निवडणुकांचा विचार करून पक्ष बदलांचा धडाका सुरू केल्याचे दिसत आहे. याचा विरोधी पक्षाला सर्वात जास्त फटका बसत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता विरोधी पक्षातील अनेक आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा दावा भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

विरोधी पक्षातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून कोकणातील पाच ते सहा आमदार भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत, असेही प्रसाद लाड यांनी म्हअले आहे. अनेक आमदारांना पक्षात यायचे आहे. पण कोणाला घ्यायचे, कोणाला नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. लवकरच आणखी मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, असेही लाड म्हणाले. दरम्यान, निवडणुकांच्या तोंडावरच विरोधी पक्षातील दिग्गज नेते पक्ष सोडत असल्याने विरोधी पक्षाला मोठे झटके बसत आहेत. तर आता लाड यांच्या विधानाने कोकणातही आघाडीला भगदाड पडणार असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)