“काही कर्मठ ब्राम्हण जोतिबांविरोधात…”; ‘फुले’ चित्रपटातील वादावर छगन भुजबळांचे विधान

Chhagan Bhujbal | गेल्या काही दिवसांपासून ‘फुले’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाला ब्राह्मण महासंघाने विरोध केला आहे. सेन्सॉर बोर्डानेही यात काही बदल सुचवले आहेत.
हा सिनेमा 11 एप्रिल रोजी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणारा होता. मात्र सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील ‘फुले’ सिनेमावरुन होणाऱ्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही स्पष्ट सांगितलं आहे की सिनेमातील एकही सीन कट होता कामा नये. कारण जे सत्य आहे तेच सिनेमात दाखवलेलं आहे. आजच्या ब्रह्मणांवर आम्ही निशाणा साधत नाही. त्यावेळी परिस्थिती काय होती. त्यावेळी देखील सगळेच ब्राह्मण ज्योतिबा यांच्या विरोधात नव्हते. अनेकांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची मदत केली आहे. Chhagan Bhujbal |
मात्र, काही कर्मठ ब्राम्हण फुलेंच्या विरोधात होते. त्यांच्याबरोर आमच्या बहुजन समाजातील अंधश्रद्धेत बुडालेले लोकही होते, ज्यांनी फुले दाम्पत्याला विरोध केला होता,” असे भुजबळ म्हणाले. Chhagan Bhujbal |
‘फुले’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अभिनेता प्रतिक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा मुख्य भूमिकेत आहेत. मात्र महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित ‘फुले’ हा चरित्रात्मक हिंदी सिनेमा सध्या वादात सापडला आहे.
हेही वाचा:
सलमान खानला पुन्हा धमकी; घरात घुसून मारणार, गाडी बॉम्बने उडवून देणार…





