बाजारात गुंतवणूक करण्यास आलेले काही नमुने आणि खरा परतावा (भाग-२)

बाजारात गुंतवणूक करण्यास आलेले काही नमुने आणि खरा परतावा (भाग-१)

आता सध्याचा बाजार पाहता, बाजाराकडून त्याहीपेक्षा कोणत्या क्षेत्राकडून अथवा कंपनीकडून अपेक्षा ठेवून गुंतवणूक करावी हे मात्र कोडं आहे. अगदी ‘सेफ बेट’ समजले जाणारे काही लार्ज कॅप्स सुद्धा मागील आठवड्यात १८ टक्क्यांनी पडले तर हुकुमाचे एक्के असणारे इंडसइंड बँक, बीपीसीएल, कोल इंडिया, हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, बजाज-ऑटो मारुति इ. शेअर्स देखील अनु. ३ ते ८ टक्क्यांपर्यंत घसरले. मागे आपण पहिले की बाजारात अनिश्चितता हीच काय ती निश्चित असते. तर मग अशा बाजारातून कमाईची अपेक्षा कशी ठेवायची ? वरती म्हटल्याप्रमाणं कांहीलोक हे बाजारात पैसा कमावण्याच्याच उद्देशानं आलेले असतात वते लोक तो शिताफीनं कमावतातच. आतापर्यंत आपणांस हे माहीत असेलच की आपल्या बाजारात शॉर्ट पोझिशन्स घेता येतात. म्हणजेच नेहमी आपण जवळ असलेले शेअर्स भाव वाढल्यास विकून नफा कमावू शकतो, त्या अगदी उलट पद्धत म्हणजे शॉर्ट सेलिंग. जवळ शेअर्स नसताना आधी विक्रीची कबूली करून व्यवहार करायचा व भाव खाली आल्यावर त्यात नफा मिळवायचा. मागील कांही दिवसांपासून कांही शेअर्स हे मंदीच्या तडाख्यात सापडलेले आपण पहात आहोत. ज्यामध्ये शॉर्ट सेलिंगद्वारे उत्तम संधी उपलब्ध होत्या. वायदे बाजार प्रकारात आपल्या जवळ शेअर्स नसताना देखील सेबीनं ठरवून दिलेल्या लॉटनुसार त्या व्यवहाराच्या एकूण रकमेच्या सर्वसाधारणपणे १०% ते ३०% मार्जिन मनी आगाऊ भरून शॉर्ट पोझिशन घेता येते.

उदा. इंडसइंड बँकेचा ठरवून दिलेला लॉट आहे ३०० शेअर्सचा. आता इंडसइंड बँकेचा भाव १६०० रुपये असताना त्याचा एकूण व्यवहार हा ४ लाख ८० हजार रुपयांचा होतो (३०० x १६००) व त्यासाठी अनामत रक्कम साधारणपणे १ लाखरुपये ठेवावी लागत असेल तर थोडक्यात २१% रक्कमच गुंतवावी लागते. अशाप्रकारे हे व्यवहार होत असतात. एकूण वायदे बाजारात साधारणपणे २०० कंपन्या उपलब्ध आहेत ज्यांमध्ये असे व्यवहार होत आहेत. त्यासाठी प्रत्येकाकरिता अनामत रक्कम ही वेगवेगळी असते.

आता असाच व्यवहार अगदी राष्ट्रीय बाजाराच्या निर्देशांकावर म्हणजे निफ्टीमध्ये देखील करता येतो. निफ्टीसाठी लॉट आहे ७५ शेअर्सचा आणि जमेची गोष्ट म्हणजे निफ्टीसाठी अनामत रक्कम ही केवळ रु. ९० हजारांच्या घरात आहे म्हणजेच केवळ १० टक्के. आता पाहुयात यातून कमाईची संधी कशी आहे ते.  मागील जवळजवळ साडेपाच महिन्यात निफ्टी या निर्देशांकानं ८.३६% परतावा दिलेला आहे, परंतु तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तेजी-मंदीच्या आवर्तनांत वायदे बाजारात निफ्टीमध्ये सुलट-उलट पोझिशन्स घेऊन ट्रेडिंगच्या स्वरूपातील परतावा आहे १३९% म्हणजेचसाधारणपणे ९० हजारांच्या गुंतवणुकीवर १,२४,८३० रू. परतावा.  खालील तक्ता १ जाने. २०१९ ते १४ जून २०१९ पर्यंत अशाप्रकारे घेतलेल्या पोझिशन्स दर्शवणारा आहे. उदा. २ जाने. रोजी निफ्टी फ्युचर्स मध्ये ११८३० ला शॉर्ट पोझिशन घेऊन ७ जाने. रोजी १०८०३ ला ती शॉर्ट पोझिशन बंद (Square Off) करून त्याच भावात तेजीची पोझिशन घेतली गेलीआणि अशाचप्रकारे पुढं याचप्रकारे सर्व तक्ता पाहावा. आता बाजारात २०० कंपन्यांमध्ये देखील अशा प्रकारे ट्रेडिंग करता येतं. जसं की याच तांत्रिकी अभ्यासाच्या आधारे इंडसइंड बँकेच्या लॉटसाठी विक्रीचा सिग्नल हा १४९३ रुपयांवर आला व शुक्रवारचा बंद भाव १४२७ आहे,  येसबँकेच्या लॉटसाठी विक्रीचा सिग्नल हा ६ जून रोजी १४३ रुपयांच्या वर आला आणि शुक्रवारचा बंद भाव ११५ रुपये आहे. आता येसबँकेचा लॉट १७५० शेअर्सचा आहे, म्हणजेच जवळपास ४९ हजारांचा नफा केवळ एका आठवड्यात, ते ही ८० हजारांच्या अनामत रकमेवर म्हणजे ६१% नफा.

परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की, कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये वायदे बाजारात ट्रेडिंग करणे हे जोखमीचं काम असतं कारण की त्यामधील अनिश्चितता,  म्हणजेच एका रात्रीत आलेली वाईट बातमी होत्याचं नव्हतं करू शकते. म्हणूनच त्यातल्या त्यात निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणं सोयीस्कर ठरतं कारण निफ्टी निर्देशांक फारतर फार एका रात्रीत ३-४ टक्के पडू शकतो. आता तेजीची पोझिशन्स कशाच्या आधारे घ्यायची व मंदीची शॉर्ट पोझिशन केंव्हा उभी करायची ये अंदर की बात हैं I  यांतून अगदी अवास्तव नाही, परंतु ठीक-ठाक कमाईच्या अपेक्षा आपण ठेवू शकतो.  म्हणजे वर्षाला ५० टक्के म्हणजे महिन्याला सरासरी ४ टक्के परतावा तर तुम्ही मिळवूच शकता. पण त्यासाठी देणाऱ्याचे आभार मानून मिळते त्यावर समाधान मानता आले पाहिजे !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)