घनकचरा संकलन कर शासन निर्देशानुसारच

मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांची माहिती 

कराड –
मलकापूर नगरपंचायतीस राज्य शासनाने 24 सप्टेंबर 2018 रोजी नगरपरिषदेचा दर्जा दिलेला आहे. नगरपरिषदेने नगरपंचायत झाल्यापासून कोणत्याही प्रकारचा स्वच्छता कर आकारणी केलेला नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण करिता राज्य शासनाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार नगरपरिषदेने प्रतिदिन एक रुपये याप्रमाणे प्रतिमहिना 30 रुपये घनकचरा संकलन कर आकारणी केली असल्याची माहिती मलकापूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ शहर अभियानामध्ये मलकापूर नगरपरिषदेने भाग घेऊन सन 2017-18 या सालामध्ये 145 वा क्रमांक मिळविला होता. सन 2018-19 मध्ये 51 वा क्रमांक मिळालेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण झालेल्या खर्चाची प्रतीपुर्तीकरिता संकलन कर गोळा करणे हे बंधनकारक असताना नगरपरिषद सन 2018-19 या सालामध्ये अशी कार्यवाही न केल्यामुळे याकरताचे गुण नगरपरिषदेस न मिळाल्याने पहिल्या 50 मध्ये स्थान मिळविता आले नाही. नगरपरिषदेने शहरातील घनकचरा संकलन गोळा करण्यासाठी प्रत्येकी 2 बकेट घरोघरी मोफत दिले असून, कचरा गोळा करण्यासाठी 9 घंटागाड्या कार्यरत आहेत. ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन याद्वारे खतनिर्मिती केली जात आहे.

दैनंदिन व्यापारी व निर्देशित क्षेत्रामध्ये झाडलोट करण्यासाठी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचा खर्च नगरपरिषदेने नगरपंचायत फंडातून केला असल्याने त्याची प्रतिपुर्ती होणे आवश्‍यक असल्याने नगरपरिषदेने महाराष्ट्र शासनाचे शासन राजपत्र असाधारण भाग-4 ब, नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचे बुधवार, दि. 19 सप्टेंबर, 2018 पत्र क्र. एम. ए. एच. बी. आय. एल./2009/37831 च्या परिपत्रकानुसार बंधनकारक असल्यामुळे, मलकापूर नगरपरिषद सर्वसाधारण सभा ठराव क्र. 16, दि. 28 फेब्रुवारी 2019 मध्ये दिलेल्या मंजुरीनुसार आकारणी करण्यात आलेली आहे.

तथापि, नगरपरिषदेने आकारणी केलेल्या घनकचरा संकलन करामध्ये फेरविचार करणेबाबत कराड तालुका दक्षिण शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशिद वगैरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार ज्या मिळकतीचा कर रक्कम 500 रुपयांचे आत आहे. अशा मिळकत धारकांना घनकचरा संकलन करामध्ये 50 टक्के सुट देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मलकापूर नगरपरिषदेने लोकसहभागाच्या माध्यमातून विविध नाविण्यपुर्ण योजना राबविल्या आहेत व त्या यशस्वीरित्या सुरु ठेवलेल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच नगरपरिषदेने एका वर्षात 129 क्रमांकावरुन 51 व्या क्रमांकावर झेप घेतलेली असल्याचेही शिंदे यांनी सांगीतले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)