सातारा : येथील सैनिक स्कूल परिसरातील पोहण्याच्या तलावात बुडून विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. कुणाल कृष्णा वाणी (वय 17 रा. नाशिक, सध्या रा . सैनिक स्कूल सातारा) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कुणाला हा सैनिक स्कूल सातारा येथे शिक्षणासाठी आला होता. आज (रविवार) स्कूलला सुट्टी असल्याने तो याच परिसरात असलेल्या पोहण्याच्या तलावात दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता.
त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी सैनिक स्कूलकडे धाव घेतली. रात्री उशीरा कुणालचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.