सोलारीस टेनिस स्पर्धा : नितीन, केतन, निरज, अजय अंतिम फेरीत

पुणे – सोलारीस क्‍लब तर्फे आयोजित सोलारीस करंडक वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या 35 वर्षाखालील गटात पुण्याच्या नितीन किर्तने, केतन धुमाळ, निरज आनंद, अजय कायम यांच्या निर्मल कुमार, श्रीकांत पारेख, अब्दुल हनिफ, एम. सुरेख यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेच्या 35 वर्षावरील गटात नीरज आनंद याने मुंबईच्या नरेंद्रसिंग चौधरी याचा सुपर टायब्रेकमध्ये 6-4, 6-7 (7-5), 11-9 असा संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरी गाठली. दोन तास तीन मिनिटे सुरू असलेल्या या सामन्यात प्रत्येक गुणांसाठी दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पहावयास मिळाली. पहिल्या सेटमध्ये नीरज आनंद याने 6-4 अशी बाजी मारली.

त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये नरेंद्र याने 4-4 अशा बरोबरीनंतर टायब्रेकमध्ये 7-6(7-5) असा विजय मिळवला. यानंतर सुपर टायब्रेकमध्ये नीरजने नरेंद्रवर 11-9 असा निसटता विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या गटात केतन धुमाळ याने विजय आनंद याचा 6-1, 6-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

55 वर्षावरील गटात अजय कामत याने एस. शंकर याचा 6-1, 6-1 असा तर, निर्मल कुमार याने मेहर प्रकाश याचा 7-5, 6-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. 45 वर्षावरील गटात अव्वल मानांकित नितीन किर्तने याने सुनिल लुल्ला याचा 6-0, 6-1 असा पराभव करून सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरी गाठली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.