मुंबईतील सोसायटीत साकारला सौरऊर्जा प्रकल्प (भाग-१)

सध्या बहुतांश सोसायटीत इको फ्रेंडली साधनांचा वापर वाढला आहे. हा वापर महागडा असला तरी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतो. मुंबईच्या एका हौसिंग कॉम्प्लेक्‍सने सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून सादर करून आदर्श निर्माण केला आहे. मुंबईतील हा कदाचित पहिलाच सौर ऊर्जा प्रकल्प असेल. उपनगरातील एका हौसिंग सोसायटीत सौर ऊर्जेच्या तंत्राने 700 किलो वॅट वीज निर्मिती केली आहे. त्यामुळे वीज बिलात सुमारे 70 टक्के कपात झाली आहे. यानुसार ऊर्जेतून विजेची मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. ही बचत म्हणजे महिनाभरात 140 डिझेल मोटारी आणि मुंबई रस्त्यावरील वर्षभरातील सुमारे 1700 गाड्या कमी करण्यासारखे आहे. यावरून सौर ऊर्जा प्रकल्प किती उपयुक्त आहे, हे लक्षात येते.

मुंबईतील सोसायटीत साकारला सौरऊर्जा प्रकल्प (भाग-२)

भांडूप (पश्‍चिम) च्या धीरज ड्रिम्स हौसिंग सोसायटीने 180 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवला. यामुळे सोसायटीतील पाणीपुरवठा, लिफ्ट, सोसायटीतील कॉमन दिवे, सीसीटीव्ही नेटवर्क, सोसायटीतील ऑफिस यासाठी लागणाऱ्या विजेत बचत झाली. आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक श्‍याम असोलेकर यांनी या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या योजनेचे समन्वयक श्रीकांत स्वामीनाथन यांच्या मते, सोसायटीचा आकार तसेच सौर फिटिंगच्या दृष्टीने ही सोसायटी सौर ऊर्जा उत्पादन करणारी शहरातील सर्वात मोठी सोसायटी ठरत आहे. या योजनेत गुंतवलेले 3.9 कोटी रुपये (700 किलोवॅट) सुमारे 3 वर्षांत टप्प्याटप्प्याने रहिवाशांकडून वसूल केले जातील. एका अंदाजानुसार सोसायटीत 2100 कुटुंब राहतात. प्रत्येक कुटुंबाची सुमारे 450 रुपयांची बचत होते. ती मेंटेनन्स कॉस्टनुसार वसूल केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.