वर्षातील पहिले चंद्रग्रहण झाल्यानंतर आता लोक सूर्यग्रहणाची वाट पाहत आहेत. हे ग्रहण मार्चमध्ये आपल्याला पाहता येणार आहे. ज्यावेळी हे ग्रहण असते त्यावेळी पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. ग्रहणाच्या वेळी जप करणे फलदायी मानले जाते. असे केल्याने ग्रहणाच्या दूषित किरणांचा जीवनावर नकारात्मक परिणाम होत नाही असा लोकांचा समज आहे. त्यामुळे 2025 चं पहिलं सूर्यग्रहण कधी दिसणार? ते भारतात दिसणार कि नाही? या सूर्यग्रहणादरम्यान गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
सूर्यग्रहण कधी दिसणार?
वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला म्हणजेच 29 मार्च 2025 रोजी होईल. हे आंशिक सूर्यग्रहण असणार आहे.
सुर्ग्रहणाचा कालावधी काय असणार?
हे ग्रहण दुपारी 2.21 ते संध्याकाळी 6.14 पर्यंत राहील. पण 14 मार्च रोजी झालेल्या चंद्रग्रहणाप्रमाणे, वर्षातील पहिले सूर्यग्रहण देखील भारतात दिसणार नाही. अशा परिस्थितीत, भारतात सुतक काळ वैध राहणार नाही.
कोणत्या देशात दिसणार सूर्यग्रहण?
हे सूर्यग्रहण बर्म्युडा, बार्बाडोस, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, बेल्जियम, उत्तर ब्राझील, फिनलंड, जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, आयर्लंड, मोरोक्को, ग्रीनलँड, कॅनडाचा पूर्व भाग, लिथुआनिया, हॉलंड, पोर्तुगाल, उत्तर रशिया, स्पेन, सुरीनाम, स्वीडन, पोलंड, पोर्तुगाल, नॉर्वे, युक्रेन, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि अमेरिकेच्या पूर्वेकडील भागात दिसेल.
गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी?
सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. जर तुम्हाला बाहेर जाणे खूप महत्वाचे असेल तर बाहेर जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पोटावर गेरूची पेस्ट लावू शकता.
सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये. जसे चाकूने भाज्या कापणे, कात्री वापरणे, सुई वापरणे इत्यादी गोष्टी वापरू नये. जर सूर्यग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी या वस्तू वापरल्या तर त्याचा होणाऱ्या बळावर विपरीत परिणाम होतो.
सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी झोपू नये. कारण असे केल्याने गर्भवती महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
सूर्यग्रहणाच्या वेळी, गर्भवती महिलांनी त्यांच्या आवडत्या देवतेचे स्मरण करत राहावे आणि शक्य तितके मंत्र जप करत राहावे. असे केल्याने सूर्यग्रहणाचा तुमच्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
(टीप : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली आहे. डिजिटल प्रभात या गोष्टींना दुजोरा देत नाही. यामधील कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)