पंढरपूर – दाढ काढल्यानंतर काही तासातच महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यात घडली आहे. दाताच्या दवाखाऩ्यात चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली असून संबंधीत डाॅक्टरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील 25 वर्षींय विवाहित महिलेची दाढ दुखत होती. उपचारासठी त्यांना पंढरपूर येथील दातांच्या दवाखान्यात नेण्यात आले. डाॅक्टरांनी दाढ काढल्यानंतर त्यांना त्रास सुरु झाला आणि काही तासांत त्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा केला जात आहे.
मयत महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी पंढरपूर येथील एका दवाखान्यात दाढ काढण्यासाठी आले होते. दाढेच्या ठिकाणी भूल देऊन दाढ काढण्यात आली. त्यानंतर रुग्ण महिलेस अशक्तपणा जाणवू लागला. काही वेळेतच उलटी झाली आणि नंतर ही महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर त्यांना सोलापूर येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. सोलापूरला उपचारासाठी जात असताना रुग्ण महिलेचा मृत्यू झाला. हा मृत्यू दातांच्या डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे झाला.