सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका शुल्लक कारणावरून भावानेच भावावर प्राणघातक हल्ला केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर सोलापूर (Solapur News) तालुक्यातील बीबी दारफळ या ठिकाणी ही घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नेताजी लक्ष्मण मोरे (वय 50) हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करून हातपाय धुवूत होते. तेव्हा त्यांचा सख्खा भाऊ तानाजी मोरे त्याठिकाणी आला. यावेळी त्याने दोघांच्या शेतात सामाईकमध्ये बसविलेले एम.एस.सी.बी.चे खांब आहेत. या खांबाला तान दिला असून त्यासाठी 1 हजार रुपयांचा खर्च आला आहे. हे पैसे मी भरले असून त्यातील निम्मे पैसे तू दे अशी मोठा भाऊ नेताजीकडे केली. त्यावर नेताजी यांनी तानाचे पैसे देण्यास नकार दिला.
हे पण वाचा : स्वारगेट प्रकरणाला एक महिना पूर्ण; अद्यापही DNA अहवाल प्रतिक्षेतच, मोबाईचाही पत्ता नाही: दोषारोप पत्रास विलंब
यानंतर या गोष्टीवरून त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तानाजी यांनी शिवीगाळ करत नेताजी मोरे यांच्या शर्टाला धरून डोक्यात दगड घातला. यामध्ये नेताजी जखमी झाले. यानंतर नेताजी मोरे यांनी सोलापूर (Solapur News) तालुका पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या भावा विरोधात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून तानाजीच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता 2023 बी.एन.एस 115 (2),118(1),351(2),352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलीस हेडकॉन्स्टेबल महिंद्रकर या घटनेचा अधिक तपास करत आहेत.