सोलापूर – पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरात रुळावरून जाणाऱ्या चार जणांना रेल्वेने धडक दिली. यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे ही दुर्घटना घडली आहे. रेल्वे रुळावर दारूच्या बाटल्या सुद्धा आढळल्या आहेत. त्यामुळे हे चारही जण दारू पीत बसले असताना अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहे.
या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत दोघांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे.
रुळाजवळ दारूच्या बाटल्या देखील सापडल्या आहेत .त्यामुळे हे मजूर दारू प्यायले असावेत असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.
चौघे मजूर रेल्वे रुळावरून जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एखाद्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा संशय रेल्वे पोलिसांना आहे. मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही.