तेलुगू सुपरस्टार प्रभासच्या “बाहुबली’ला मिळालेल्या यशानंतर आगामी “साहो’ चित्रपटाची प्रेक्षक खुपच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रभासच्या आगामी ‘साहो’ सिनेमाचा दमदार टीझर लॉन्च झाला आहे. अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी साहो सिनेमाच्या टीझरबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.
HERE IT IS! https://t.co/KzMb5nCcsa #SAAHOTEASER #PRABHAS @sujeethsign ❤️
— Shraddha (@ShraddhaKapoor) June 13, 2019
या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर रोमांस करताना दिसणार आहे. या चित्रपटातून ही जोडी पहिल्यांदाच झळकणार असून चित्रपटातील एक स्टिल फोटो ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या मल्टी-स्टारर चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाशिवाय जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, मुरली शर्मा, अरुण विजय, एवलिन शर्मा, चंकी पांडे, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर यासारख्ये दिग्गज कलाकारांची मायंदळी आहे.