सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या भाषांतरासाठी सॉफ्टवेअर

9 प्रादेशिक भाषांमधील अनुवाद शक्‍य
कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे 9 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे, “सुप्रिम कोर्ट वैधानिक अनुवाद सॉफ्टवेअर’ असे या सॉफ्टवेअरचे नाव असून आर्टिफिशियल इंटेलिजेंसद्वारे प्रशिक्षित केलेले एक मशीन लर्निंग टूल आहे. त्याचा उपयोग सुप्रीम कोर्टाच्या निकालांचा स्थानिक भाषेत अनुवाद करण्यासाठी केला जाऊ शकतो. 26 नोव्हेंबर 2019 रोजी हे सॉफ्टवेअर सादर केले गेले आहे, अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये प्रश्‍नोत्तराच्या तासादरम्यान दिली.
या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे आसामी, बंगाली, हिंदी, कन्नड, मराठी, ओडिया, तमिळ, तेलगू आणि उर्दू या 9 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद केला जाऊ शकतो. याची व्याप्ती अधिक वाढवलीही जाऊ शकते.
सध्या कामगार, भाडे कायदा, भूसंपादन आणि विनियोग, सेवा, नुकसान भरपाई, गुन्हेगारी, कौटुंबिक कायदा, सामान्य नागरी, वैयक्तिक कायदा, धार्मिक व धर्मादाय वेतन, साधा पैसा आणि तारण, सार्वजनिक हक्क (बेदखल) कायदा, जमिनीशी संबंधित कायदे व कृषी भाडे व ग्राहक संरक्षणाशी संबंधित प्रकरणांचे भाषांतर केले जात आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.