इंदूर – मध्यप्रदेशाती साॅफ्टवेअर इंजिनिअर तरुणाने पाच दिवसांत दोन लग्नं केली. पितळ उघडे पडताच तरूण फरार झाला असून विवाहितेच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
26 वर्षीय इंजिनिअर तरूण इंदूरच्या मुसखोडी येथील रहिवासी आहे. त्याने 2 डिसेंबर रोजी खंडवा येथील एका मुलीशी विवाह केला. लग्नानंतर मुलीला त्याने इंदूरला नेले. मात्र, तिथे गेल्यावर महत्वाच्या कामासाठी भोपाळला जात असल्याचे सांगून 7 डिसेंबर रोजी इंदूरमधील महू येथील एका तरूणीशी दुसरा विवाह केला.
महू येथील लग्न सोहळ्याला उपस्थित असलेल्या एका नातेवाईकाने लग्नाचे फोटो व्हायरल केले. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तरूणाविरोध पोलीसांत फसवणुक केल्याची तक्रार केली आहे. लग्नात 10 लाख रूपये खर्च केला. हुंडा म्हणुन त्याला बऱ्याच वस्तू दिल्या आहेत. दुसरे लग्न करून त्याने आम्हाला फसवले आहे. असे मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे.