कॉंग्रेसकडून सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार 

प्रकाश आंबेडकर यांचे कॉंग्रेसच्या पत्राला प्रत्युत्तर

अकोला  – कॉंग्रेस आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात सध्या पत्राचा खेळ रंगला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी कॉंग्रेसकडून आघाडीच्या लेखी पत्राला प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारेच उत्तर दिले आहे. या पत्रात त्यांनी कॉंग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांना आघाडी सामील होण्यासंदर्भात लेखी प्रस्ताव दिला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंबेडकरांना प्रत्यक्ष हा लेखी प्रस्ताव दिला होता. त्याला प्रकाश आंबेडकर यांनी चार पानी पत्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या माध्यमातून कॉंग्रेसला लिहिले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी या पत्राद्वारे उत्तर देत कॉंग्रेसच्या आघाडीच्या हेतूवरच संशय व्यक्त केला. कॉंग्रेसने वारंवार आपली भूमिका बदलली असून कॉंग्रेस आता सॉफ्ट हिंदुत्वाचा पुरस्कार करीत आहे. आपण जुलैपासून कॉंग्रेसकडे आघाडी संदर्भात पाठपुरावा करीत आहोत. मात्र कॉंग्रेसने आमच्याकडे वारंवार दुर्लक्ष केले. आपली भूमिकाजागांसंदर्भात नसून तात्विक मुद्द्यांवर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याच्या मुद्द्यावर कॉंग्रेसप्रणीत महागठबंधनमधील घटक पक्षांतील विधीतज्ज्ञ नेत्यांची समिती गठीत करण्याची मागणी आंबेडकर यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. या पत्रावर कॉंग्रेसच्या उत्तराची वाट पाहत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या पत्राला कॉंग्रेस काय उत्तर देते याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)