मेलबर्न : अमेरिकेच्या २१ वर्षीय सोफिया केनिनने आॅस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं. यासह या स्पर्धेत यंदा महिला एकेरीमध्ये नवी विजेती मिळाली आहे. केनिनने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या गार्बिन मुगुरूझाचा पराभव करत पहिले ग्रँडस्लम स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. दोघीही स्पर्धक पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या.
Maiden Slam Moment!@SofiaKenin captures her first Grand Slam title in a fearless 4-6 6-2 6-2 comeback over Muguruza for the #AusOpen women’s singles 🏆#AO2020 pic.twitter.com/HU8mijCbTh
— #AusOpen (@AustralianOpen) February 1, 2020
सोफियाने अंतिम सामन्यात मुगुरूझाचा ४-६, ६-२, ६-२ असा पराभव केला. ही लढत २ तास २ मिनिटे चालली. या विजयासह मारिया शारापोव्हानंतर आॅस्ट्रेलियन ओपन जिंकणारी ती सर्वात तरूण टेनिसपटू ठरली. शारापोव्हाने वयाच्या २० व्या वर्षी २००८ मध्ये या स्पर्धेचे विजतेपद पटकावलं होते.
Good job, kid! 👏
Kenin becomes the youngest #AusOpen women’s singles champion since Maria Sharapova in 2008.#AO2020 | @SofiaKenin pic.twitter.com/a5TecDMfk6
— #AusOpen (@AustralianOpen) February 1, 2020
या विजयानंतर सोफियाला बक्षीस म्हणून २८ लाख यूएस डाॅलर ( २० कोटी रूपये) रक्कम मिळाली आहे. तसेच तिच्या क्रमवारीत देखील सुधारणा झाली आहे. तिने १४ व्या स्थानावरून ७ व्या स्थानी झेप घेतली आहे.
Sofia, meet Daphne 😍#AO2020 | #AusOpen | @SofiaKenin pic.twitter.com/0Vg5Jp4Bj7
— #AusOpen (@AustralianOpen) February 1, 2020
दरम्यान, सोफियाने उपांत्य फेरीत अग्रमानांकित अॅश्ले बार्टीवर ७-६ (८-६), ७-५ अशी मात करत तर मुगुरूझाने रोमानियाच्या हॅलेपचा ७-६(१०-८), ७-५ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.