भाजप नगरसेविकेच्या सांगण्यावरुन सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण

भोसरी एमआयडीसी ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी – भाजप नगरसेविका सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्या सांगण्यावरुन चार जणांनी मारहाण केल्याची फिर्याद बालाजीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र लक्षमण सरवदे यांनी दिली आहे. तर या प्रकरणात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

महेंद्र सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन निलेश उर्फ गज्या भीमराव पवार (वय 30, रा. साईपार्क कॉलनी, दिघी) सागर उर्फ सिद्धूधन शिवलिंग भोसले (वय 32., रा. निगाहें करम मशिदीजवळ, बालाजीनगर, भोसरी) आणि विशाल भिमराव हाके (वय 30 रा. आदर्शनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

एका युट्यूब चॅनेलवरील खंडणीखोर नगरसेविका या मथळ्याखालील पोस्ट 25 ऑगस्टला फेसबुकवर टाकली होती. याचा राग मनात धरुन भाजप नगरसेविका सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्या सांगण्यावरुन फिर्यादी व त्यांच्या वडीलांना मारहाण करत, हॉटेल उषाकिरणमधील 3 हजार 120 रुपये घेऊन, धमकी दिली, असे या फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत सारंग कामतेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.

याच प्रकरणी एक दिवसांपूर्वी महेंद्र सरवदे याच्या विरोधोत देखील मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मित्राला शिवीगाळ होत असताना मध्यस्थी करणाऱ्याबद्दल विचारणा करत तरुणाला बापलेकासह चार जणांनी मारहाण केली. ही घटना इंद्रायणीनगर कॉर्नर येथील उषाकिरण हॉटेलसमोरील पान टपरीजवळ मंगळवारी (दि.25) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

निलेश भीमराव पवार (वय 30, रा. ममता स्वीट होमजवळ, इंद्रायणीनगर) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी महेंद्र सरवदे, त्याचे वडील व दोन अन्य साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निलेश पवार हे त्यांचा मित्र विशाल हाके यांना शिवीगाळ करताना आरोपींनी सागर भोसले मध्यस्थी का करतो, या कारणावरुन पवार आणि हाके यांना दगड व लाकडाने मारहाण केली. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.